सोलापूर : अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी आपल्या शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे प्रदेश कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन सादर केले. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळच्या थेट कर्ज योजना तातडीने सुरु करण्याबाबत या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड.मोहम्मद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुर्हाण, प्रदेश सचिव जाकीर काझी, प्रदेश सचिव तहेर जमींदार, कादर शेख, जावीद शेख, आदीची या शिष्टमंडळात उपस्थिती होती.

















