सोलापूर : महानगर पालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना झाल्यानंतर कोनापुरे चाळीचे दोन भाग करण्यात आले होते, ती चाळ संपूर्ण प्रभाग क्रमांक 12 मध्ये घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी हरकत घेतली. दरम्यान माजी गटनेते चेतन नरोटे यांनीसुद्धा प्रभाग क्रमांक 12 मधील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर हरकत यावेळी घेतली होती.
दरम्यान आता अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 12 मधील अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी करून साडेतीन हजारावर आणण्यात आली त्यामुळे प्रभाग क्रमांक 12 मध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण पडणार नाही यामुळे नाराज झालेले अंबादास करगुळे यांनी शुक्रवारी महापालिका पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन चेतन नरोटे यांच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
ज्या भागामध्ये आम्ही मागील पाच वर्षात अनेक विकास कामे केली तो भाग जाणीवपूर्वक कट करण्यात आला आहे आणि याला संपूर्ण कारणीभूत हे चेतन नरोटे असल्याचा आरोप अंबादास करगुळे यांनी केला…


















