सोलापूर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (cabinet minister dhananjay munde) हे शनिवारी सोलापूर दौर्यावर होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथल्या गोकुळ शुगर (Gokul Shingare) गाळप सांगता समारंभ झाला त्यांनी उपस्थिती लावली. भाषण करताना मुंडे यांनी अनेक किस्से सांगितले, ग्रामीण भागात काही म्हणी प्रसिद्ध आहेत, त्यातील एक म्हणं ‘होत्याचं नव्हतं झालं’ हि भारतीय जनता पार्टीला (BJP) परफेक्ट बसली. 2019 साली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता कशी आली, हे मजेदारपणे त्यांनी सांगितले, मी सांगत होतो शरद पवारांच्या (Sharad Pawar) नादी लागू नका, पण भाजपने ऐकलं नाही आणि 105 आमदार असलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले याला म्हणत्यात “होत्याचं नव्हतं झालं”पहा हा व्हिडीओ मुंडे काय म्हणाले….


















