सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या रविवारी सोलापुरात होत्या. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. उजनी धरणातील पाण्याचा विषय, सोलापूर राज ठाकरे यांची भूमिका, नवाब मलिक प्रकरण यावर त्यांनी पक्षाचे मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे प्रदेश सचिव नलिनी चंदेले, शहराध्यक्ष सुनिता रोटे, लता ढेरे मनीषा नलावडे, लता फुटाणे यांची उपस्थिती होती.
राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, राज ठाकरे हे भरकटलेले नेते आहेत, त्यांना कधीही शरद पवार होता येणार नाही, शरद पवार समजून घेण्यासाठी अगोदर त्यांची 4-5 पुस्तके वाचा शरद पवारांवर टीका करून अनेक नेते मोठे झाले आहेत. कुठे गेली त्यांची ब्लू प्रिंट. त्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचा विकास करणार होते निश्चित त्यांच्या मनात राज्याविषयी तळमळ आहे ते चांगले वक्ते आहेत. त्यांचे व्हिजन आहे मात्र ते सध्या भरकटल्या सारखे करत आहेत, अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली


















