सोलापूरातील शाळा न्यायाधिकरण प्राधिकरण सोलापूरातच ठेवण्यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठीचे प्रयत्न काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सुरु केले असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संवाद साधत याबाबतचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करावा व शाळा न्यायाधिकरण प्राधिकरण सोलापूरातच ठेवावे अशी मागणी केली आहे.
शाळा न्यायाधिकरण प्राधिकरण बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर सोलापूरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यामुळे आता सोलापूरकरांना या कामासाठी पुण्याला जावं लागणार आहे. हा निर्णय रद्द व्हावा यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी शासन दरबारी प्रयत्न सुरु केले असून याबाबतचं निवेदन त्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिलं आहे. हे कार्यालय न हलवता सोलापुरातच कायम ठेवावी अशी मागणी केली आहे.
निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री वर्षा गायकवाड व प्रधान सचिवांशी तात्काळ फोनवर संवाद साधून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे. याबाबतची माहिती आज माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

















