सोलापूर : राज्याच्या पंचायत राज समितीचा दौरा सोलापूर जिल्ह्यात होता. जिल्हा परिषदेमध्ये दिनांक 26, 27 व 28 मे रोजी या समितीच्या भेट, बैठका व प्रशासनाच्या साक्षी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून त्याची लगबग बैठका जिल्हा परिषदेमध्ये सुरू होत्या दरम्यान दौरा पुढे ढकलण्यात आला असून येणाऱ्या 15, 16 व 17 जून 2022 रोजी हा दौरा होणार असल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाकडून जिल्हा परिषदेला पत्राद्वारे सुचित करण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 31 मे 2022 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या विविध विकास योजनांचा आढावा घेणार आहेत. त्याच्या तयारीसाठी हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


















