सोलापूर :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंना यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देताना बोलले होते.या वक्तव्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात माहिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलने केले. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश सचिव नलिनी चंदेले, शहराध्यक्ष सुनिता रोटे, लता ढेरे, मनीषा नलावडे, मंगला कोल्हे, लता फुटाणे, शशिकला कसपटे,मनीषा माने, प्रदेशच्या सायरा शेख यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी होत्या.


















