Wednesday, October 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदेंनी चांगला कार्यक्रम ‘मिस’ केला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 May 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







सोलापूर : सोलापूर जिल्हा हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, परंतु जिल्ह्यात सध्या भारतीय जनता पार्टी एक नंबरवर आहे. अशातच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले त्यातही काँग्रेस तिसऱ्या नंबरवर आहे. 

यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर मध्य या ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून यायचे. त्यामध्ये शहर-मध्य सोडता दक्षिण सोलापूर हा तर हक्काचा मतदारसंघ आणि बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र या तालुक्यातील काँग्रेस नाममात्र होत चालल्याचे चित्र आहे. 

पूर्वी आनंदराव देवकते, दिलीप माने, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, गुरु म्हेत्रे, उमाकांत राठोड, भीमाशंकर जमादार, हरीश पाटील असे दिग्गज नेते काँग्रेसमध्ये होते मात्र त्यापैकी बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, हरीश पाटील असे बोटावर मोजण्याइतकी नेते मंडळी दक्षिणमध्ये सक्रिय आहेत पण काँग्रेसला त्यांचा कितपत फायदा होतो हा संशोधनाचा विषय आहे. 

सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेसचा चेहरा म्हणून सुरेश हसापुरे यांची ओळख निर्माण होत आहे. त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही असे असतानाही हसापुरे यांनी तालुक्यातील किमान साठ विकास कार्यकारी सोसायट्यांवर आपली सत्ता कायम राखली आहे. या सोसायटी विजयाच्या अडून त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काँग्रेस आणखीच मजबूत केल्याचं पहायला मिळते. या सर्व सोसायटीच्या संचालकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हसापुरे यांनी आपल्या वाढदिवसादिवशी  29 मे रोजी केले होते. 

या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, यांच्यासह माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. 

कार्यक्रम जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी होता. कार्यक्रमाची वेळ सकाळी दहाची होती परंतु साडे नऊ वाजल्यापासूनच सोसायटी संचालक आणि हसापुरे समर्थकांनी टाकळीकर हॉल भरभरून गेला होता या कार्यक्रमाला दक्षिण मधला एकही प्रमुख नेता नव्हता त्यांना सोडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं  तरीही हजारोच्या संख्येने हसापुरे समर्थक कार्यक्रमाला उपस्थित होते. 

मंगल कार्यालय खचाखच भरले होते, हॉलच्या बाहेर सुद्धा शेकडो कार्यकर्ते थांबून होते हॉलमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे लोकांनी थांबून कार्यक्रम पाहिला. यावरून हसापुरे यांच्यावर प्रेम करणारा वर्ग किती मोठा आहे याची प्रचिती रविवारी सर्वांना आली. एकीकडे सोलापुरातील काँग्रेसचे कार्यक्रम पाहिले तर दोन चारशे लोकांची गर्दी जमायला नाकीनऊ येते. 

मात्र हसापुरे यांच्या कार्यक्रमाची गर्दी पाहता अजूनही काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितच काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या दोन नेत्यांपैकी एक जण तरी या कार्यक्रमाला हवे होते. स्वतः हसापुरे यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या अनुपस्थिती बाबत  उपस्थितांसमोर दिलगिरी व्यक्त करत त्यांच्या न येण्याचे कारण सांगितले. एकूणच चांगला कार्यक्रम या दोन दिग्गज नेत्यांनी मिस केला अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : सोलापुरात पोलीस हवालदार बडतर्फ ; आयुक्त हरिष बैजल यांचा दणका

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात पेट्रोल पंप बंदची अफवा ; खरेदी बंद मात्र विक्री चालू ; नागरिकानो गोंधळून जाऊ नका

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात पेट्रोल पंप बंदची अफवा ; खरेदी बंद मात्र विक्री चालू ; नागरिकानो गोंधळून जाऊ नका

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002769
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group