सोलापूर : शहरातील पेट्रोल पंप दोन तीन दिवस बंद आहे अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी शेकडो दुचाकी चालक गर्दी करत आहेत.
सुपर पेट्रोल पंप येथे चौकशी केली असता उद्या नेहमीप्रमाणे पेट्रोल पंप चालू राहील असे सांगितले आहे तसे नोटीस सुद्धा त्यांनी पेट्रोल पंपावर लावली आहे. दरम्यान सोलापूर पेट्रोल व डीलर असोसिएशनचे प्रकाश हत्ती यांनी माहिती दिली की,मंगळवारी सोलापुरातील सर्व पेट्रोल पंप चालक पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणार नाहीत मात्र विक्री आहे तशीच चालू राहणार आहे.
दरम्यान खरेदी बंद करण्यामागील त्यांनी कारण सांगताना शासनाने अचानक पेट्रोल आणि डिझेल मध्ये कपात केली त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे तसेच मागील पाच वर्षापासून चे कमिशन मिळाले नाही म्हणून या मागण्यांकडे आम्ही लक्ष वेधून घेणार आहोत. सोलापूरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व पेट्रोल पंप मात्र चालू राहणार आहेत.


















