सोलापूर : ओबीसी आरक्षणाचा शिवाय निवडणुका नको या भूमिकेतून राज्यातील पंचवीस महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका (municipal corporation election) थांबवण्यात आल्या होत्या, राज्याच्या अधिवेशनात असा सर्वपक्षीय ठराव मंजूर झाला होता मात्र नुकताच सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) ओबीसी आरक्षण (obc reservation) शिवाय निवडणुका घेण्याच्या सूचना केल्या असून थांबलेली निवडणूक प्रक्रिया पासून पुढे प्रक्रिया सुरू करून तारखा जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
त्यामुळे आता राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 77 व पंचायत समितीच्या 154 जागांसाठी सोलापूर जिल्ह्याच्या सर्व पंचायत समिती कार्यालय व तहसीलदार कार्यालयात प्रारूप प्रभाग रचना नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये 77 जिल्हा परिषद व पंचायत समितीचे 154 सदस्य संख्या निश्चित आहे. अधिसूचना आणि अंतिम प्रभाग रचना नकाशा पाहू शकता
खालील लिंकवर क्लिक करा👇👇
https://drive.google.com/file/d/1irfTOL6ZBIKjra4U7S4hJhdl_2tU3Psc/view?usp=drivesdk
👇👇👇👇👇👇👇
येथे क्लिक करून पहा जिल्हा परिषदेचे 77 गट व पंचायत समितीचे 154 गण