सोलापूर : सोलापूरातील शाळा – न्यायाधिकरण बंद करण्याचा शिक्षण आणि क्रिडा विभागाचा निर्णय तुर्त स्थगीत करण्यात आला आहे. ही माहिती आमदार प्रणिती शिंदे कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.
सोलापूरात उस्मानाबाद आणि नगर या जिल्ह्यांच शाळा न्यायाधिकरण गेली अनेकवर्ष सुरु आहे. मात्र अलिकडेच हे न्यायाधिकरण बंद करण्याचा आदेश निघाला होता. या संबंधात आमदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना पत्र देवून भेटून न्यायाधिकरण बंद न करण्याविषयी विनंती केली होती.
सध्यस्थितीत १५० अपीलं या न्यायाधिकरणाकडे प्रलंबीत आहेत. तर रोज तिन्ही जिल्ह्यातून मिळून १५ वर अपिल दाखल होतात. शिक्षण मंत्री गायकवाड यांनी प्रणिती शिंदेंच्या पत्राची दखल घेवून हा निर्णय स्थगीत ठेवण्याबाबत संबंधीतांना आदेश दिले आहेत. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.