सोलापूर : सोलापुरात महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सायंकाळी राजपुताना प्रतिष्ठानच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
विधान परिषदेचे आमदार सुजितसिंग ठाकूर यांनी उपस्थिती लावून मिरवणुकीची शान वाढवली. त्यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या मूर्तीची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक दर्शनभाई दुबे, मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलपंत वडजे, कार्याध्यक्ष विजय झवेरी, मार्गदर्शक रवींद्र दुबे, उज्वल दीक्षित, जितेंद्र इटाई, बिजापूरचे महापौर परशुराम राजपूत, माजी विरोधीपक्ष नेते अमोल शिंदे, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, विठ्ठल वानकर, निवृत्त कृषी अधिकारी नागेश चंदेले, नागेश खरात त्यांच्यासह विविध समाजातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते मिरवणुकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती करण्यात आली होती त्याच्या मागोमाग हनुमानाची मोठी मूर्ती होती तर दुसरे आकर्षण म्हणजे अयोध्या मधील राम मंदिराची प्रतिकृती आणि श्रीरामाची मूर्ती मधोमध ठेवण्यात आली होती.
हे चित्र सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. डॉल्बीवर युवकांनी ठेका धरला. महाराणा प्रताप यांच्या जयघोषात मोठ्या जल्लोषी वातावरणात ही मिरवणूक संपन्न झाली. चार हुतात्मा स्मारकापासून सुरू झालेली मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली.