सोलापूर : 17 जून रोजी होणार प्रारुप मतदार यादी जाहीर सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी 17 जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना महापालिकेला प्राप्त झाल्याची माहिती पालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे यापूर्वीच प्रभाग रचना जाहीर झालेले त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आरक्षण सोडत जाहीर झाली आहेत.यामुळे मोर्चेबांधणीला वेग आला आहेत दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना महापालिका निवडणूक महापालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली.
17 जून रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.17 जून ते 25 जून पर्यंत या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत त्यानंतर निवडणूक आयोगाकडून 07 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी सांगितले दरम्यान मे अखेरपर्यंत ज्या मतदारांनी नोंदणी केले आहेत. त्यांचा समावेश या मतदार यादीत असेल असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.