भास्कर प्रभाकर थोरात पोलीस उपअधीक्षक यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 56 होते. दिनांक 4 जून 2022 रोजी रात्री एक वाजता पुणे येथे त्यांची प्राणज्योत मालवली.
भास्करराव थोरात यांची सोलापूर जिल्ह्यात बरीच वर्षे सेवा झाली आहे. यापूर्वी सोलापूर ग्रामीण येथे स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा तसेच मंगळवेढा व मोहोळ विशेष शाखा पोलीस उपअधीक्षक पदावर सेवा बजावली. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांचा अंत्यविधी बीड येथील अमरधाम स्मशानभूमी मोंडा रोड येथे होणार आहे.