सोलापूर : ॲग्रो फुडसच्या विविध उत्पादनाची सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात डिलरशीप देण्यासाठी सोलापुरातील एका व्यापाऱ्याकडून डिपॉझिट पोटी 62 लाख 15 हजार रुपये घेतले. 3 महिन्याने कंपनी बंद झाली म्हणून न वटणारे चेक देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी मुंबईच्या ऍग्रो फुड्सच्या चेअरमन विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात त्या चेअरमनला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपी ॲग्रो फुडस लिमीटेड, सेक्टर क्र १५ सीबीडी बेलापुर नवीमुबईचे चेअरमन अशोक निवृतीराव पाईकराव वय ४९ रा. ब्लु माऊंटन टॉवर, शास्त्रीनगर, लोखंडवाला सर्कल, अंधेरी, पश्चिम, मुंबई यांनी त्यांचे कंपनीचे प्रोडक्ट १) टोमॅटो सॉस २) जाम ३) कोकोनेट कॅन्डी ४) आद्रक लसुन पेस्ट ५) शेजवान चटणी ६) मँगो अचार ७) मिक्स अचार ८) जेली चॉकेलेट असे उत्पादीत करत होता.
फिर्यादी जवाहर सत्यनारायण मुंदडा डिस्ट्रीब्युटर, सोलापुर वय – ४९ वर्षे यशोधन बंगलोज, ब्लॉक ०४, सम्राट चौक सोलापूर व साक्षिदार कुणाल दत्तात्रय कुनगुलवार वय २९ वर्षे, व्यवसाय – व्यापार रा. फ्लॅट नंबर ११०१ सी बिल्डींग, इंद्रधनु, लक्ष्मीपेठ, देगाव रोड, सोलापुर व महेश मधगोंडा कोरे वय वर्षे, व्यवसाय-व्यापार, राहणार जवळकरवस्ती, सम्राट चौक, सोलापुर यांना त्याचे कंपनीकडुन मिळणारे जास्त फायदे / अमिष दाखवून सोलापुर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र करीता सुपर स्टॉकिष्ट, कॅरी अॅन्ड फॉरवडींग म्हणून नेमण्या करीता डीपॉसिटपोटी एकुण ६२,१५,४९९ इतकी रक्कम कंपनीचे खात्यावर रक्कम स्वीकारुन दोन ते तीन महिने व्यापार केला. त्यानंतर कंपनीत नुकसान झाले म्हणुन कंपनी बंद करुन यातील साक्षिदारा कडुन डीपॉसिट पोटी स्वीकारलेली रक्कम व कंपनीकडील नफा असे वेगवगळया रक्कमेचे चेक दिले. परंतु ते चेक कंपनीचे खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने न वटता परत आले. त्यानंतर यातील आरोपी हा कंपनीचे कार्यालय वगैरे बंद करुन पळून गेलेला होता.
आरोपीने कंपनी चालु असतांना वापरात असलेले सर्व मोबाईल नंबर बंद केले व नागपुर येथील खोटे पत्ते दिलेले होते.सदरचा आरोपी हा गेल्या १ वर्षापासुन फरार होता. सदर आरोपीचे नातेवाईकाचे मोबाईल नंबरचे सिडीआर एसडीआरची माहितीवरुन नमुद आरोपीला दिनांक ०१/०६/२०२२ रोजी ब्लु माऊंटन टॉवर, शास्त्रीनगर, लोखंडवाला सर्कल, अंधेरी, पश्चिम, मुंबई येथून सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.