सोलापूर : रस्ता अडवून वाढदिवस साजरा केल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते चेतन नरोटे यांच्यासह इतर दोघांवर फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चेतन नरोटे यांच्यासह मुश्ताक मुर्तुज शेख राहणार सहारा मल्टीपर्पज हॉल, नई जिंदगी व अब्दुल रमजान तांबोळी राहणार चिंचोळी, अक्कलकोट असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शनिवार 4 जून रोजी चेतन नरोटे यांचा वाढदिवस होता.वाढदिनी रामलाल चौकात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुश्ताक मुर्तुज शेख व अब्दुल रमजान तांबोळी यांनी क्रेनद्वारे मोठा हार नरोटे यांना घालण्यासाठी आणला होता. यामुळे मोठी गर्दी झाली व रामलाल चौक ते सरस्वती चौक दरम्यान रस्ता बंद झाला यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. म्हणून फौजदार चावडी पोलिसांनी वाढदिनी गर्दी केल्याबद्दल चेतन नरोटेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.