सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचार्यांची सहकारी पतसंस्था नियमित नं. १, सोलापूर या पतसंस्थेची सन २०२१-२२ ची ८८ वी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी शांतीसागर मंगल कार्यालय रेल्वे लाईन सोलापूर येथे संपन्न होणार आहे. सन २०२१-२२ या वर्षी संस्थेस रुपये ७७ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. त्या अनुषंगाने लाभांश व बचत ठेव व्याज असे एकूण १ कोटी सहा लाखाचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते ऑनलाईन वितरित होणार आहे. सदर रक्कम सभासदांच्या खातेवर सोमवार पासून जमा होणार आहेत.
पतसंस्था कर्जावर ६ टक्के दराने व्याज आकारणी करते. वसूली कमी होऊनही संस्थेने अत्यंत काटकसरीने कामकाज करून लाभांश व बचतठेव व्याज दर ५ टक्के नी अदा करण्यात येणार आहे. संस्थेचे भाग भांडवल १५ कोटी १३ लाखाचे झाले आहे. बचतठेव ७ कोटी ८६ लाख आहे. संस्था स्वभांडवली कर्ज वितरित करते. सुसज्य कार्यालय, सभासदांसाठी विश्राम गृह, सभासदांचे कर्ज एन.ई.एफ.टी ने खातेवर जमा, कॅशलेस सुविधा, कुटुंब विमा, एस. एम. एस. सेवा, कर्ज मर्यादा ५ लाख, तातडी कर्ज २५००० मर्यादा असलेचे चेअरमन हरिबा सपताळे यांनी सुचित केले.
या सभेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , संतोष धोत्रे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, अजयसिंह पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी, चंचल पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेस हरिबा सपताळे चेअरमन, डी. व्ही. राठोड व्हा. चेअरमन, व्ही आर लिंगराज, श्रीशैल देशमुख, डी. पी. घाडगे, डी.एस . घोडके, ए. बी. जगताप, एस. ए. चेळेकर, एस. आर. तांबोळी, एस. यू. नागटिळक, व्ही. बी. पाटील, एस. बी. जाधव, एस. आर. भिंगे, एस. व्ही. यादगिरी, एम. एस. शिंदे, टी. एम. राऊत, डॉ. एस. पी. माने तज्ञ संचालक, सचिव देशपांडे, सुभाष काळे लेखनिक उपस्थित होते.