सोलापूर : काँग्रेस भवनामध्ये जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती यावेळी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तालुक्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेण्यात आली त्यावेळी उत्तर सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष शालीवाहन माने यांनी
उत्तर तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहता आघाडी करावे लागेल अशी भाषा त्यांच्या तोंडून आली. याच वेळी माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण भोसले उठले त्यांनी सडेतोड बोलण्यास सुरुवात केली. पूर्वी माने-साठे गट एकत्र होते, आता परिस्थिती वेगळी आहे.
कुणी पुढे होऊन डेरिंग करत नाही, काँग्रेसला मानणारा वर्ग असून सर्व गण स्वतंत्र लढू या, आम्हाला विश्वासात घ्या, तडजोडचे राजकारण नको. असे म्हणत यापूर्वी आम्ही दिलीप माने यांच्या सोबत होतो, आमची मैत्री आहे. परंतु दिलीप माने व काका साठे हे नाटकी आहेत, ऐनवेळी एकत्र येतात, जोडगोळी आहे ही असे म्हणून लक्ष्मण भोसले बसले.