सोलापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले तीनही खासदार निवडून आणून महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला. या विजयाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
सोलापुरात भाजपच्या कार्यालयासमोर माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, लोकसभा खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांच्या हातात भारतीय जनता पार्टीचा झेंडा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी झेंडा हातात घेणे टाळले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून सोलापुरात आपल्या बनावट जातीच्या दाखल्याने वादग्रस्त ठरलेल्या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला पक्षाच्या झेंड्याची एवढी ऍलर्जी का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

















