सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निमंत्रित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी शहराशी संबंधित काही प्रश्न मांडले यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विशेष अभिनंदन त्यांनी केले. त्यांनी एका मुद्द्यात हद्दवाढ भागात सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनचे काम अपूर्ण आहे. भाजपच्या काळात आणि भाजप आमदारांच्या कंपनीला देण्यात आले आहे म्हणताच आमदार राम सातपुते यांनी लगेच आक्षेप घेतला. भाजप आमदारांचे नाव कशाला घेता, यावर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी किती काँट्रॅक्ट घेतले या नावाची यादी देऊ का? या शब्दात त्यांनी बागवान यांच्या वाक्यावर नाराजी व्यक्त केली तेव्हा बागवान यांनी आपला तो शब्द मागे घेतला पहा हा व्हिडीओ….

















