सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील रस्त्यांवर वादळी चर्चा झाली. यामध्ये रस्त्यांच्या कामासाठी होत असलेली मुरूम खोदाई आणि मुरूम वाहतूकी मधून खराब होणारे रस्ते ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. मोहोळचे आमदार यशवंत माने हे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर असून पंढरपूर मंगळवेढयाचे आमदार समाधान आवताडे हे रस्ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. पेशाने कॉन्ट्रॅक्टर असलेल्या या दोन्ही आमदारांनी रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट वरून आपले भाष्य केले राजकीय विरोधक असणाऱ्या या नेत्यांनी एकमेकांना मजेदार चिमटेही काढले. आमदार यशवंत तात्या माने यांनी आमदार समाधान दादांना उद्देशून तुम्ही बैठकीमध्ये आमदार म्हणून बोला कॉन्ट्रॅक्टर म्हणून नको असे म्हणून चिमटा काढला यावेळी आमदार अवताडे दादांनी यशवंत तात्यांनाही त्यांच्याच स्टाईलने उत्तर दिले. पहा नेमके काय घडले सभागृहात

















