अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा, सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे. राहुल गांधी हे १३ जून २०२२ रोजी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालय दिल्ली येथे हजर राहिले आहेत कटकारस्थान करून कोणत्याही क्षणी त्यांना अटक केले जाऊ शकते.
त्यानुषंगाने, सदर बेकायदेशीर चौकशीच्या निषेधार्थ दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने अप्पर तहसील कार्यालय, मंद्रूप येथे दक्षिण सोलापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष महेश जोकारे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन केली.
महेश जोकारे व सेवादल अध्यक्ष उमाशंकर राऊत यांनी भाजपाच्या चुकीच्या राजकारणाचा आणि कटकारस्थानाचा विरोध केला.
यावेळी उपाध्यक्ष अनंत म्हेत्रे, सरचिटणीस ॲड. रविकांत पाटील, युवानेते जितू गावडे, अक्षय रणखांबे, शब्बीर नदाफ, ग्रा. पं. सदस्य महासिद्ध कुंभार, जाफर नदाफ, सचिन विरदे, याशिन पठाण, प्रमोद स्वामी, हारून जमादार, समीर नदाफ, संदीप बिराजदार, आसिफ नदाफ, तोसिफ शेख, महिबुब पठाण, राजकुमार देशमुख, प्रकाश धुळखेडे, सोनू शिवशरण, रितेश गावडे, योगेश गावडे, दयानंद गावडे, रुपेश गावडे, सचिन गावडे, हृतिक गायकवाड, चंदू देशमुख, आनंद गावडे, शाम कांबळे व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

















