सोलापूर – वनपरिक्षेत्र सोलापूर यांचे क्षेत्रातील मोजे कुरघोट या गावात तितर पक्षाच्या शिकार करणारे आरोपी नागनाथ अण्णप्पा खुटेकर वय ५५ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी हा मौजे कुरघोट येथील रहिवासी असून तो तितर पक्षाची शिकार करताना नेचर कॉर्झवेशन सर्कल सोलापूर या वन्यजीव प्रेमी संस्थेचे सदस्य साहिल सनधी यांनी पकडला व त्वरीत वनविभागास माहिती दिली.
माहितीच्या आधारे डी. पी. खलाणे ( वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली एस. ई. सावंत (वनपाल दक्षिण सोलापूर), व वनरक्षक टी. एम. बादणे हे घटनास्थळी त्वरीत पोहचून त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. व सदर आरोपीवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २,९,३९ व ५१ अन्वये वनगुन्हा क्रमांक २१ नोंद करुन दस्ताऐवज तयार केले आहेत.
या आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वन्यजीवांची शिकार करु नये व वन्यजीवांची शिकार करताना आढल्यास त्वरीत वनविभाग सोलापूर यांना संपर्क करावा किंवा वनविभागाचे टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


















