सोलापूर : ‘ईडी’चा गैरवापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक लक्ष करत आहेत. त्या निषेधार्थ सोलापुरात शहर काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी बंदोबस्तसाठी असलेल्या पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेताना यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं….


















