सोलापूर- सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात विविध उपक्रमांत यश संपादन केले आहे. सायकल बॅंक, कोरोना मुक्त गाव अभियान, स्वच्छ सुंदर शाळा असे उपक्रम प्रेरणादायी आहेत. या उपक्रम यशस्वी राबविले बद्दल अभिनंदन ठराव घेण्यात आला असे पंचायत राज समितीचे अध्यक्ष डाॅ. संजय रायमुलकर यांनी सांगितले.
पंचायत राज समितीची आढावा बैठक व भेटीनंतर तिसऱ्या दिवशी अहवाल वाचन घेण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या प्रसंगी आमदार विक्रम काळे, आमदार अनिल पाटील, आमदार कैलास पाटील, सिईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परिषदेने मुलींसाठी सुरू केलेली सायकल बॅंक संपूर्ण राज्यासाठी हेवा वाटणारा उपक्रम आहे. मुलींना शिक्षणाचे प्रवाहात आणणेसाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. असेही अध्यक्ष रायमुलकर यांनी सांगून राज्यात असे उपक्रम राबविणेच्या सुचना पंयाचत राज समिती अन्य जिल्ह्याला देणार असल्याचे सांगितले.
सोलापूर जिल्हा परिषदेचा अभिनंदनाचा ठराव ..!
पंचायत राज समितीने सोलापूर जिल्हा परिषदेने लोकसहभागातून राबविलेले विविध उपक्रमा बद्दल अभिनंदनाच ठराव केला. पहिल्याच दिवशी सिईओ दिलीप स्वामी यांचे सायकल बॅंक बद्दल अभिनंदनाचा ठराव करणेत आला. उमेद अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पचकाविला आहे. या बद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांचा अभिनंदनाचा ठराव घेणेत आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने राबविलेले सेवा पुस्तक पडताळणी, स्वच्छ सुंदर शाळा, माझे गाव कोरोना मुक्त गाव, आपले सरकार सावा केंद्र, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत विविध उपक्रम याबद्दल अभिनंदन करणेत आले.
मंगळवेढा सामुहिक पाणी पुरवठा योजना सुरू करणेचे सुचना
…………….
केवळ पाणी पट्टी व दुरूस्ती अभावी रखडलेली ३९ गावांची पाणी पुरवठा योजना सुरू करणे चे सुचना दिले असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.या साठी पाणी पुरवठा विभागास सुचना देणेस आले असल्याचे सांगणेत आले.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...