Monday, June 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सक्त सूचना ; आषाढी वारीत यावरच भर द्या….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 June 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.16 (जिमाका): आषाढी वारीसाठी विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातूनही लाखो भाविक पंढरपुरात  येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

 नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाबाबत संबंधित विभागाच्या आढावा बैठकीत श्री शंभरकर बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांत अधिकारी  गजानन गुरव, अप्पासाहेब तुपसमिंदर यांच्यासह  संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत यंदा मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्याने नगरपालिका प्रशासनाने स्थानिक लोकसंख्या विचारात घेऊन स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात करावा. तसेच 65 एकर पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी मुबलक प्रमाणात शौचालयाची व्यवस्था करावी. याचबरोबर तात्पुरते शौचालय उभी करून त्याच्या वेळच्या वेळी स्वच्छतेसाठी यंत्रणा उभी करावी, वेळोवेळी पाहणी करावी. ज्या मठ प्रमुखाने तात्पुरत्या शौचालयाची मागणी केली असेल त्यांना उपलब्ध करून द्यावीत. वारी कालावधी मध्ये वारकऱ्यांना गॅस वितरण व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता गॅस वितरण कंपनीने घ्यावी.

यात्रा कालावधीत अन्नपदार्थामध्ये भेसळ होणार नाही याची अन्न व औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी. 3 जुलैपासून शहरातील हॉटेल्स, प्रसाद दुकाने याची वेळोवेळी तपासणी करावी. दोषी आढळलेल्या व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. अन्नातून विषबाधा होणार नाही, शिळ्या अन्न वारकऱ्यांना देऊ नये, याबाबत मठ प्रमुखांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात. पंढरपूर शहर, पालखी मार्ग येथील औषध विक्री दुकाने दिवस-रात्र सुरू राहतील, याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशाही सूचना श्री शंभरकर यांनी केल्या.

महावितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, शहरात अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी. जलसंपदा विभागाने यात्रा कालावधीत भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत नियोजन करावे. जेणेकरून वारकऱ्यांना चंद्रभागा  स्नानासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच नदीपात्रातील वाहतूक करणाऱ्या होड्यांना सुरक्षितेच्या बाबतीत आवश्यक त्या सूचना द्याव्यात.

आवश्यक त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था करावी. याठिकाणी तज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. नवीन बसस्थानकावर पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या आहेत, पाण्याच्या सुविधेसाठी एसटीचे टँकर घ्यावेत, अशा सूचनाही श्री शंभरकर यांनी दिल्या.

अपर जिल्हाधिकारी श्री जाधव यांनी सांगितले कि, वारी कालावधीत सर्व मोबाईल जॅम होतात. संपर्कासाठी फोनची सुविधा खंडित होऊ नये.यासाठी बीएसएनएलने टॉवरची क्षमता वाढवून 21 ठिकाणी हॉटलाइन सुविधा द्यावी.

हिंमत जाधव म्हणाले, गॅस वितरण आणि डिलेव्हरीच्या ठिकाणी रेस्क्यू टीम ठेवावी. मोबाईल सेवेसाठी विविध कंपनीचे मोबाईल व्हॅन टॉवर राहणार आहेत.

जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी सर्व विभागांनी पूर्ण तयारी करण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक विभागाने केलेली तयारी सादरीकरणातून मांडली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या सीईओ स्वामींची “सायकल बँक” जाणार महाराष्ट्रात ; Solapur CEO Swami’s “Cycle Bank” to go to Maharashtra

Next Post

दिलीप माने सहकारातील परिसस्पर्श ; सोलापुरात ज्येष्ठ संपादकांचे गौरवोद्गार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दिलीप माने सहकारातील परिसस्पर्श ; सोलापुरात ज्येष्ठ संपादकांचे गौरवोद्गार

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985907
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group