सोलापूर : दिलीप माने वाढदिवस गौरव समितीच्या वतीने नेहरू नगर इथल्या शासकीय मैदानावर (डीएमपीएल) दिलीप माने प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे यांच्या हस्ते झाले .
यावेळी माजी आमदार दिलीप माने, युवानेते पृथ्वीराज माने, बाल विकास प्रकल्प़ अधिकारी समाधान नागणे, ब्रह्रमदेवदादा माने बँकेचे चेअरमन चंद्रकांत कुलकर्णी, अजित माने तालुकाध्यक्ष, सुनिल जाधव समन्वयक़ ॲङ अजित पाटील, अजय सोनटक्के, उमेश भगत, बीएमआयटीचे प्रा. राहूल माने, उपप्राचार्य एस.जी. कुलकर्णी, बीएमपीचे प्राचार्य श्रीधर कुलकर्णी, बँकेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी, सचीव तात्या कदम आदि मान्यवऱ़ व्यासपिठावर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सचिन जवळकोटे म्हणाले, दिलीप माने हे तरुण वयापासून खेळाडूंसाठी प्रयत्न करत आले आहेत. पार्क स्टेडियमची उभारणी असो की, सोलापूर शहरातील मैदानाच्या विकासासाठी प्रयत्न. तरुणांमध्ये ऊर्जा वाढवायची असेल तर खेळाशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी ही धडपड सुरू आहे. असे सांगत सहकार क्षेत्रातील साखर, बँक, सोसायटी, दूध असेल असे कोणतीही सहकार क्षेत्र नसेल तिथे माने यांचा परिसस्पर्श झाला नाही. त्यातून त्यांनी लोकांचे सोने केले आहे, या स्पर्धेतून खेळाडूंच्या आयुष्याचे सोने होईल असे गौरवोद्गार जवळकोटे यांनी काढले.
यावेळी निखील देशपांडे, धनंजय म्हेत्रे, विकास पाटील, सचीन गुंड, गंगाधर बिराजदार, संभाजी भडकुंबे, महेश घाडगे, विकास कदम, रणजित दवेवाला, नागेश म्हेत्रे, युवराज चव्हाण, नागेश बिराजदार, मोतीबने सर, दत्ता पवार यांची ही उपस्थिती होती. या स्पर्धेत दक्षिण व उत्त़र सोलापूर ग्रामीण भागातील 20 टीमने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.




















