सोलापूर : रात्रीच्या सुमारास बारमध्ये येऊन दारू पिऊन पैसे न देता बाटल्यांची तोडफोड केली. मॅनेजर व वेटरशी हुज्जत घालून हॉटेल मालक माजी सभागृह नेते संजय कोळी यांना शिवीगाळ करत खंडणीची मागणी केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेल मॅनेजर विजय भास्कर सुरवसे, राहणार उत्तर कसबा, शिवमंदिर जवळ पत्रा तालीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) बाळु कुमार बनसोडे, २) अक्षय प्रकाश थोरात, ३) संजय गायकवाड, ४) राकेश चंदनशिवे सर्व राहणार न्यु बुधवार पेठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्रीच्या सुमारास सफारी बार अॅन्ड रेस्टारंट, भवानी पेठ येथे सर्व आरोपी आले. त्यांनी दारू, बियर व चकणाची ऑर्डर मागवून घेवून टेबल नं ३ वर दारूचे बाटल्या व बियरचे बाटल्या फोडून वेटर अशोक देवगण व फिर्यादीशी हुज्जत घालून शिवीगाळ, दमदाटी केली तसेच तुला बघुन घेतो अशी धमकी दिली आहे तसेच हॉटेलमधील टेबल, ग्लास बाटल्या, फर्नीचर झाडे लावल्याचे कुंडया यांची तोडफोड करून दहशत निर्माण करून हॉटलेमध्ये इतर बसलेल्या १० ते १५ गिन्हाईक सैरावैरा पळून गेले त्यावेळी हॉटेलचे मालक संजय कोळी येवून नमुद आरोपीना तोडफोडीची विचारणा केली व बिल मागीतले असता आरोपी क्र २ याने आम्ही बिल देणार नाही उलट तुला हॉटेल चालवायचे असेल तर मला प्रत्येक महिना ०५ हजार दयावे लागतील तुम्ही पैसे दिले नाही तर पुन्हा पुर्ण हॉटेल मधील सामानाची तोडफोड करेन अशी धमकी देवून बाहेर जात असताना झाडयाचे कुंडया फोडून एकूण अंदाजे १० हजार रूपयाचे नुकसान करून मोठ-मोठयाने शिवीगाळ करू लागले त्यामुळे सदर परिसरातील लोक भितीने आपले दुकान बंद करून सैरावैरा पळून गेले. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.


















