सोलापूर : विनापरवाना डिजिटल लावले, ते काढण्यास सांगितले असतानाही न ऐकल्याने फौजदार चावडी पोलिसांनी अजित गायकवाड व गौतम चंदनशिवे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात गुंडू बड्डुरे नेम फौजदार चावडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) अजित गायकवाड, वय – ३५ वर्षे, रा- न्यु बुधवार पेठ सोलापूर, २) गौतम ऊर्फ महाराज चंदनशिवे, वय-३५ वर्षे, रा. मिलींद नगर, बुधवार पेठ, सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले की, 17 जून रोजी प्रबुद्ध भारत चौक मिलिंद नगर बुधवार पेठ या ठिकाणी अंदाजे १० बाय २० चे एक डिजीटल बोर्ड त्यावर आदित्य चंदनशिवे आपणास वाढदिवसानिमित्त मनपुर्वक शुभेच्छा असे व दमाणी प्रशालेजवळ बुधवार पेठ सोलापूर या ठिकाणी १० बाय १० चे डिजीटल बोर्ड त्यावर एस. आर. गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर असे लिहीलेले डिजीटल बोर्ड हे सार्वजनिक रस्त्यास अडथळा होईल असे विनापरवाना लावून सोलापूर शहराचे सौदर्यास बाधा येईल असे कृत्य केले आहे. तसेच डिजीटल बोर्ड काढून घेण्याची सुचना देऊन सुध्दा न काढल्याने आयोजक यांच्याविरोधात कायदेशीर फिर्याद आहे.


















