सोलापूर : जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक दोनची वार्षिक सर्वसाधारण सभा रंगभवन चौकातील समाज कल्याण केंद्रात संपन्न झाली सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यासपीठावर चेअरमन सुधाकर माने देशमुख, व्हाईस चेअरमन सतीश लोंढे, संचालक रणजीत घोडके, संचालक गिरीश जाधव,खजिनदार श्रीकांत धोत्रे, कक्ष अधिकारी सिद्धेश्वर बोरुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी 32 लाखाचा लाभांश ऑनलाइन पद्धतीने खातेदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश हसापुरे यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले, वाईट परिस्थितीत सुद्धा हे पतसंस्था सभासदांना लाभांश देते हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत असो किंवा नसो कायम पतसंस्था क्रमांक दोनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही हसापुरे यांनी दिली.
यावेळी संचालक सुनंदा जाधव, श्रीकृष्ण घंटे, श्रावण मोरे, राणी सुतार, सिंधुबाई म्हेत्रे, विजया राऊत, प्रकाश बिराजदार, विलास माने, महेश रूपनर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

















