दक्षिण तालुक्यातील विंचूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या समर्थकांच्या गुरु सोमलिंग शेतकरी ग्रामविकास पॅनल नाही सर्व 13 जागांवर विजय मिळविला विरोधकांचा दारुण पराभव केला.
विंचूर विकास सोसायटीच्या 13 पैकी 12 जागांसाठी गुरुसोमलिंग शेतकरी ग्राम विकास पॅनल आणि श्री अमोगसिद्ध शेतकरी ग्राम विकास पॅनलचे उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी भटक्या विमुक्त मतदार संघातून भीमाशंकर कोरे यांची बिनविरोध निवड होऊन हसापूरे गटाने विजयाची सलामी दिली होती.
रविवारी संचालकांच्या बारा जागांसाठी दोन्ही पॅनलमध्ये चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत मतदान होऊन मतमोजणीला सुरुवात झाली. इतर मागास प्रवर्गातून हसापुरे गटाने सुरू केलेली विजयाची घोडदौड कायम राखली. यामध्ये या गटाचे सर्व बारा संचालक विजयी झाले.
विंचूर विकास सोसायटीची 1987 मध्ये स्थापना झाली होती. आज पर्यंत एकाच गटाकडे सत्ता होती. परंतु स्थापनेनंतर पहिल्यांदाच निवडणूक होऊन सत्तांतर घडले. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक कारणास्तव ही संस्था चर्चेत राहिली. आमदार सुभाष देशमुख यांनीही आक्षेप घेतला होता. त्याचा काहीही परिणाम न होता मतदारांनी बदल घडवून आणले. दरम्यान हसापुरे यांच्या निवासस्थानी सर्व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हसापुरे यांनी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाचे आभार मानत मी तुमचा चाकर म्हणून काम करेन अशी ग्वाही दिली…
विजयी उमेदवार कंसात मते :
सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी – अप्पासाहेब बिराजदार (67), बलभीम चव्हाण (73), बाळासाहेब चौगुले (69), महादेव कोळी (67), सुरेश मलाबदे (77), शरणप्पा म्हेत्रे (74), राजकुमार पाटील (76) अण्णाराव झाडबुके (70). महिला प्रतिनिधी – महादेवी बिराजदार (५९), उमाबाई पवार (५९). इतर मागास प्रवर्ग -काशीनाथ घोंगडे (72). अनुसूचित जाती विजयकुमार साबळे (७५).
सत्ताबदलासाठी श्रीमंत पुजारी, शिवानंद उमदीकर, काशीनाथ हिंगमिरे, अप्पासाहेब झाडबुके, लक्ष्मीकांत पाटील, संदेश पाटील, लक्ष्मीकांत बनगोंडे, अमोगसिध्द बिराजदार, रमेश चव्हाण, नाना साबळे आदींनी पुढाकार घेतला होता.


















