सोलापूर : विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व 5 जागा निवडून आल्याबद्दल सोलापुरात भाजपच्या शहर कार्यालयासमोर आमदार विजयकुमार देशमुखांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा झाला.
यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख माजी नगरसेवक किरण देशमुख माजी सभागृह नेता संजय कोळी माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी गुलाबांच्या पाकळ्यांची मुक्त उधळण करत भाजप झेंडा हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
विजयी प्रतिक्रिया देताना आ. देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व कौशल्याचा विजय असून महाविकास आघाडीतील नाराज आमदारांनी दिलेला कौल आहे. यावरून मागील अडीच वर्षात सरकारने जनतेचा केलेला विश्वासघात स्पष्ट होतो. अद्यापही भाजपच्या वरिष्ठांकडून कोणता निरोप नसल्याचे स्पष्ट करत आमदारांना अपेक्षित कामे झाली नाहीत, त्यामुळे आमदार विरोधात होते म्हणूनच हे सत्ता परिवर्तनाचे संकेत आहेत.




















