
सोलापूर : सोलापूर शहरात सकाळच्या सुमारास जड वाहनांना नो एन्ट्री असते. ट्राफिक पोलिसांनी अडवून सुद्धा ट्रक तसाच शहरात घातला. पोलिसांनी थांबवण्याच्या प्रयत्न केला उलट पोलिसाच्या दुचाकी वाहनाला ट्रकने पाठीमागून धडक दिली. यात पोलिस जखमी झाला असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे तसेच याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोहेकॉ पृथ्वीराज चंद्रकांत फुटाणे, नेम शहर वाहतुक शाखा उत्तर,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक भैरवनाथ सोमनाथ झेंडगे, राहणार भांबेवाडी, तालुका माहोळ, जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हे सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास मार्केट यार्ड येथे कर्तव्यावर असताना ट्रक क्रं. एम एच १३ सी टी ००७७ हे वाहन पुणे रोडवरुन शहर हद्दीत येत असल्याचे फिर्यादी यांनी पाहिले व त्यास थांबण्याचा इशारा केला परंतु तो थांबला नाही व तो ट्रक जुना बोरामणी नाक्याच्या दिशेने गेला त्यामुळे फिर्यादी हे पोकों पंडागळे यांना सांगितले की, सध्या सोलापूर शहरात शाळा सुरु असून सोलापूर शहरात गेलेला ट्रक परत वळवून आणतो असे सांगुन फिर्यादी हे फिर्यादीची मोटार सायकल क्रं. एम एच १३ सी एल ३३७८ वरुन जुना बोरामणी नाका येथे जाईपर्यंत सदरचा ट्रक पुढे गेला होता.
म्हणून फिर्यादी सदर ट्रक थांबविण्याकरीता पुढे शांती चौकाच्या दिशेने गेले व ट्रक गाडी थांबव, गाडी बाजुला घे, सोलापूर शहरात सध्या नो एन्ट्री आहे असे जोरजोरात ओरडुन सांगत असताना देखील चालक त्याची ट्रक पुढे घेवून जात असताना फिर्यादी हा गाडी चालवत ट्रक चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा देत असताना ट्रक चालकाने त्याकडे दुर्लक्ष करुन, जाणीवपुर्वक निष्काळजीपणाने फिर्यादीच्या गाडीस उजव्या बाजुस पाठीमागून जाणून बुजून जोरात धडक देवून फिर्यादीस गाडीसकट जमिनीवर खाली पाडले.
त्यामुळे फिर्यादीच्या गाडीचे उजव्या बाजुचे पाठीमागील लाईट फुटली व गाडीच्या डावया बाजुचा पत्रा चेमटला त्यामुळे फिर्यादीच्या गाडीचे अंदाजे ४,०००/ रुचे नुकसान करुन फिर्यादीस जोरात धडक देवून फिर्यादी जमिनीवर पडल्याने फिर्यादीच्या गुडघ्यास व गुडघ्याचे खाली मुक्का मार लागुन खरचटले आहे व फिर्यादीचे दोन्ही हात जमीनीवर आपटल्याने फिर्यादीच्या हातास मुक्का मार लागला आहे. तरी यातील वरील आरोपीताने फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, फिर्यादीच्या मोटार सायकलला निष्काळजीपणाने जाणीवपुर्वक मागुन धडक देवून गाडीचे नुकसान केले व फिर्यादीस जखमी करण्यास कारणीभुत झाला आहे. तसचे फिर्यादीच्या अंगावर धावुन येवून फिर्यादीच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन फिर्यादीस शासकीय कामापासुन परावृत्त केले आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंताकिंती हे करीत आहेत.

















