सोलापूर : राज्यात चाललेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शासकीय विश्रामगृहात शहर व जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. सर्वांनी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री सोबत असल्याचा एकमुखी निर्धार केला. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा महाराष्ट्रात या, अशी भावनिक हाक दिली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या पहा हा व्हिडीओ…..


















