सोलापूर : महा विकास आघाडी सरकार मध्ये चाललेल्या राजकीय घडामोडी वर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापुरातील पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतली यावेळी बोलताना त्यांनी महाविकासआघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत भाग कंपनी अजूनही पाठीशी आहोत सध्या गटनेते पदाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत राज्यपाल राष्ट्रपती राजवटीचा विचार करू शकणार नाहीत.
दरम्यान नाना पटोले यांनी अजित पवारांवर निधी देण्यावरून आरोप केले होते. यावर आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सावध भूमिका घेतली. मी भांडून निधी आणला आहे आणि यापुढेही निधी आणण्याची माझ्यात ताकद आहे असे सांगून काँग्रेसची बाजू सांभाळून घेतली.पहा काय म्हणाल्या त्या….

















