सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पडीक असलेल्या इमारतीमध्ये एका बहात्तर वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची ओळख पटली असून ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटरचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
रजिया सलीम शेख असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मयत महिला ही जुना विडी घरकुल परिसरात राहत होती. मागील दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून समजले. शेवटी या परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पाहिले असता महिलेचा मृतदेह आढळून आला.
या महिलेच्या मुलींनी ओळख पटताच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले त्यानंतर घटनेचे पंचनामा करून मृतदेह लादेन यांच्या ऍम्ब्युलन्समध्ये घालून सिव्हील हॉस्पिटलकडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे दरम्यान ही आत्महत्या आहे की खून याबाबत पोलीस तपास करत आहेत.


















