२०१९ साली माझ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मी केलेल्या कामांवर विश्वास टाकत मला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.देशाचे नेते आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षाने मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली.
आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम,सामान्य प्रशासन, मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय या खात्यांचे राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी साहेबांचे, मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बारामती लोकसभा मतदारसंघ्याच्या लोकप्रिय खा. सौ. सुप्रियाताई सुळे, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब तसेच मंत्रिमंडळातील माझे सहकारी व विधिमंडळातील सर्व सदस्य यांचे आभार मानतो.
राज्यमंत्रीमंडळात काम करत असताना राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचा आनंद आहे. या अडीच वर्षाच्या कार्यकाळात माझ्या सोबत काम करणारे माझ्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनीही माझ्याबरोबर मेहनत घेतली. राज्याच्या हिताकरिता माझ्यासोबत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानतो. यापुढे काम करत असताना इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून २०१४ ते २०१९ या काळातील विरोधीपक्षाचा आमदार म्हणून असलेल्या अनुभवाच्या शिदोरीवर मतदारसंघात विविध विकासकामांच्या संदर्भात माझे कार्य अखंड सुरू राहील. आपले प्रेम व आशीर्वाद यापुढेही असेच माझ्या पाठीशी कायम राहतील, हीच अपेक्षा!
आपलाच,
दत्तात्रय भरणे (मामा)

















