“एक विवाहितेचा लहान मुलासह शंभर टक्के जळालेल्या अवस्थेत घरापासून थोड्या अंतरावरील शेतात मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. सध्या करमाळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.”
– डॉ.विशाल हिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा
सोलापूर : करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे एका विवाहितेने मुलासह पेटून घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी २८ जून या तारखेला विवाहितेने आत्महत्या केली. विवाहितेची पती दत्तात्रय आंबारे हे गवंडी काम करत असल्याचे समजत आहे. त्यांना दोन मुले आहेत.
संध्या दत्तात्रय आंबारे ( वय २२ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर शंभू दत्तात्रय आंबारे (वय ३ वर्षे) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असणाऱ्या शेतात ही घटना घडली. घरापासून काही अंतरावर ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समजली असून नेमकी ही आत्महत्या की हत्या हे याबाबत उलटसुलट चर्चा आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. घटनेची माहिती समजताच करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
गौडरे येथे विवाहितेने आत्महत्या केली. विवाहितेची पती दत्तात्रय आंबारे हे गवंडी काम करत असल्याचे समजत आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यातील एक मुलगा गावात अंगणवाडीत जातो तर दुसरा लहान मुलगा आहे. त्यातील एक मुलगा व आई यांनी पेटून घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याचे कारण अद्याप समजले नाही. घटनेची माहिती समजताच डॉ. हिरे व कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील मृतदेह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले आहे. याचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक कोकणे यांनी सांगितले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करीत आहेत.

















