एकनाथ शिंदेंचा शपथविधी होताच सोलापूरात समर्थकांचा प्रचंड जल्लोष पहावयास मिळाला, तर एकनाथ भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच सोलापूरात त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत प्रचंड जल्लोष केला. गुरुवारी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथ ग्रहण सोहळा होताच त्यांचे समर्थक मनिष काळजे कार्यकर्त्यांसह ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी नाचत जल्लोष केला. एकनाथ शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, जय भवानी जय शिवराय आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी मनिष काळजे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन वाटचाल करीत आहेत याचा अभिमान आहे. हिंदुहृदसम्राट बाळासाहेबांच्या, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आज महाराष्ट्रात विराजमान झाले आहे याचा आम्हा शिवसैनिकांना अभिमान वाटतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असतील असा पूर्ण विश्वास आहे.
यावेळी सुजित खुर्द, अर्जुन शिवसिंगवाले, निहाल शिवसिंगवाले, उमाकांत कारंडे, आकाश बुरंगे, सागर राजपूत, प्रकाश शिवसिंगवाले, प्रकाश कुंभार, योगेश बंबईवाले, रवी शिवसिंगवाले, सुदर्शन शिवसिंगवाले, राज जगताप, शिवराज कोरे, आदित्य जगताप, श्रावण कोळी, कोळप्पा विटकर, लालू पवार आदी उपस्थित होते.

















