सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या काय चाललंय याचा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. पंचायत राज समितीचा दौरा झाला या दौऱ्यापूर्वी सर्वच प्रशासनाला डोकेदुखी होती मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने दौरा पार पडल्याने जिल्हा परिषदेचे संपूर्ण प्रशासन आनंदी दिसले.
पंचायत राज समितीचा दौरा संपतो ना संपतो तोच जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी व झेडपीच्या शिक्षणाला मिळालेला आशेचा किरण… किरण लोहार हे तेव्हापासून रजेवर आहेत. त्यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना विचारले असता शिक्षणाधिकारी लोहार हे आजारी असल्याचं समजलं मात्र नक्की लोहार यांना कोणता आजार झाला आहे हे समजू शकत नाही शकले नाही. इतक्या दिवस रजा घेण्याचा उद्देश काय नेमका? कोणता आजार झाला आहे? या कोडयात जिल्हा परिषद पडले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये आता तर अशी चर्चा सुरू झाली आहे की किरण लोहार सोलापूर मध्ये इच्छुक नाहीत ते आपली बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये येऊन अजून वर्ष सुद्धा झाले नाही एवढ्यात ते आपली बदली कशी करून घेतील हा सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. लोहार यांच्या कारभारावर सीईओ दिलीप स्वामी हे चांगलेच नाराज झाले असल्याची माहिती मिळत आहे.
शिक्षण अधिकारी नसल्याने विभागातील कर्मचार्यासाठी कार्यालय म्हणजे “आवो जाओ घर तुम्हारा” अशी अवस्था झाली आहे. तजमुल मुतवल्ली हे तर ऑफिस इन्चार्ज असताना ते कधीही आपल्या खुर्चीवर बसलेले दिसत नाहीत, कायम बाहेर फिरतीवर असतात. यावरून ते बिनधास्त आहेत. त्यांना आवर घालणारा कुणी नाही असे चित्र आहे. अशा वातावणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.


















