सोलापूर : 10 जुलै रोजी देशात बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभमीवर सोलापूर शहर पोलिस प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करणे सक्तीचे केले आहे. काय आहेत त्या मार्गदर्शक सूचना पाहूया….
“बकरी ईद- २०२२ अनुषंगाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सुचना”
१.बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक करणार नाही याची नोंद घ्यावी.
२. बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही याची सक्त नोंद घ्यावी.
३.गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलीसांशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
४.कोणतीही खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही संघटनांचे कार्यकर्ते यांनी गोवंशीय जनावरांची वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आल्यास स्वतः अवैधपणे वाहन अडविणार नाहीत.
५. बकरी ईदच्या अनुषंगाने कुर्बानी ही नागरिकांनी प्रतिकात्मक स्वरूपात द्यावी.
६. कुर्बानी नंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उघडयावर कोणत्याही प्रकारची घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
७. स्वच्छतेचे पालन करून रोगराई, दुर्गंधी पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.
८. बकरी ईद दिवशी आषाढी एकादशी असल्यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.
९. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे.
१०. सोशल मिडीयाव्दारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करून जातीय सलोखा अबाधित ठेवावा.
११. एखादी अप्रिय अथवा चुकीची घटना आजूबाजूला घडत असल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष येथे त्वरित माहिती द्यावी.
१२. कोणत्याही धार्मिक स्थळी अक्षेपार्ह भाष्य / वक्तव्य केले जाणार नाही याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी.
१३. बकरी ईदच्या अनुषंगाने नमाजाचेवेळी प्रत्येक ईदगाह येथे आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत.
१४. उपरोक्त सुचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सर्वानी सहकार्य करावे.


















