सोलापुरातील कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या शहरातील व परगावातील 12 वी पास हुशार परंतु गरीब मुलांना सारथी फाउंडेशनच्यावतीने प्रत्येकी 10 हजार रुपये स्कॉलरशिप देण्याचे नियोजन आहे. तसेच उपयुक्त वाचनालय, कॉम्प्युटर, वायफाय, स्मार्ट टीव्ही, तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादींसह राहण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या किंवा करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांस प्राधान्य देण्यात येणार आहे. किमान 80 टक्के आणि त्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या गरजू विद्यार्थ्यांनी आपली बारावी मार्कलिस्ट 9420488991 या क्रमांकावर व्हाटसअप किंवा saratheefoundation@gmail.com यावर इमेल करावे, असे आवाहन सारथी फाउंडेशनचे श्रीनिवास बुरा यांनी केले आहे.


















