
सोलापूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होत असते. मंदिर समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापूजेचे निमंत्रण दिले असून मुख्यमंत्र्यांनी पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना राज्यातील सर्वच टोलनाक्यावरून मोफत सोडले जाईल, असा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील संपूर्ण वारकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
दरम्यान सोलापुरात वारकऱ्याच्या वाहनाला टोल घेण्यात आला आणि टोलनाक्यातील कर्मचाऱ्यांनी जीआर दाखवा असे वारकऱ्यांना म्हटले असा व्हिडिओ प्रसारमाध्यमावर व्हायरल झाला आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एकाही टोल नाक्यावर वारकऱ्यांना टोल घेतला जात नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. याबाबत वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्यावर टोल घेतला नसल्याचे स्वतः वारकऱ्यांनी सांगितल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

















