सोलापूर (प्रतिनिधी) : हद्दवाढ भागातील विविध समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना योग्य त्या सूचना केल्या. या बैठकीला नगर अभियंता चलवादी, सुनील लामकानी, मठपती, डंके आदी अधिकारी उपस्थित होते.
प्रताप नगर येथील स्मशानभूमी येथे पाणीपुरवठा कमी आहे तसेच येथील पाईपलाईन जुनी झालेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करावी, दोन भागातील सर्वांना प्रॉपर्टी कार्ड लवकरात लवकर मिळावे, सुरवसे नगर येथील गणेश बिल्डर्स मध्ये राहणाऱ्या लोकांना गणेश वहिवाटीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी महापालिकेच्या रिकाम्या जागा आहेत त्या जागेवर ओपन जिम सुरू करावे.
वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अर्धवट भागातील जुळे सोलापूर येथे बस स्थानक तसेच नाट्यगृह करण्यासंदर्भात विचार करावा, संभाजी तलावामध्ये बोटिंग चालू करणे व वाढलेली जलपर्णी काढावी, अर्धवट भागातील जुळे सोलापूर सह इतर अनेक ठिकाणी गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उकळलेले आहेत ते दुरुस्त करून घ्यावेत अशा अनेक सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.


















