पंढरपूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे या उपस्थित होत्या. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर
बा विठ्ठला, तुझी कृपादृष्टी आम्हा सर्वांवर राहू दे. तुझ्या कृपेने सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध आणि आनंददायी राहो असे साकडे त्यांनी घातले.
पंढरपुरात वारकऱ्यांसोबत पावसामध्ये संवाद साधताना डोक्यावर तुळस घेतली आणि आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.


















