Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Flash News : प्लॅस्टिक बंदीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य ; स्वच्छ्ता दिंडीचा असाही समारोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 July 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर/पंढरपूर दि, 10 (जिमाका ):-संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी यावर्षी शौचालये बांधण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकांनी स्वच्छतेला महत्व देऊन स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी म्हणून राज्यात या मोहीमेची व्याप्ती अधिक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता व ग्रामसभा दिंडी समारोप कार्यक्रम मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाला. यावेळी आमदार तानाजी सावंत, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पाणी पुरवठा विभागाचे सहसचिव अभय महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे प्रकल्प संचालक रणधीर सोमवंशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  राज्यातील अनेक गावे स्वच्छ आणि समृध्द होत आहेत. राज्यात वैयक्तिक शौचालये बांधण्याची मोहीम सुरू आहे.  पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक शौचालये उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. तसेच यापूर्वी बांधलेली शौचालये दुरुस्ती अभावी वापराविना पडून राहू नये यासाठी दुरुस्ती व डागडुजीला शासन मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

*निर्मलवारी स्तुत्य उपक्रम*

स्वच्छता दिंडीचा गेल्या 17 वर्षापासून पुणे ते पंढरपूर एक चांगला उपक्रम सुरु आहे. या दिंडीच्या माध्यमातून राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये सामाजिक प्रबोधन केले जात आहे. या माध्यमातून प्रत्येक गावात ग्राम स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी व त्यातून ग्रामीण भागाचे जीवनमान स्तर उंचावण्यास मदत मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच केंद्र शासनाच्या संकल्पनाची ग्रामीण भागात अंमलबजावणी करून शाश्वत विकास करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी म्हटलं. स्वच्छता वारी निर्मल वारी हा उपक्रम अत्यन्त चांगला असून यातून ग्रामीण भागाच्या विकासात मदत होणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी देऊन या स्वच्छता दिंडीत सहभागी असणाऱ्या कलाकारांचे काम ही प्रभावी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी- कर्मचारी यांचे व यासाठी प्रबोधन करणाऱ्या कलाकारांचे त्यांनी कौतुक करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता दिंडीत उत्कृष्ट काम करणाऱ्या पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सोलापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, साताराचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, पुणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांचा समावेश आहे.

प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा समारोप कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते “यशोगाथा जिल्हा परिषदेची” या पुस्तकाचे व आषाढी वारी 2022 या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लोककलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करुन स्वच्छतेचा संदेश दिला.  पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव अभय महाजन यांनी प्रास्ताविक केले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी आभार मानले.

SendShareTweetSend
Previous Post

असा मुख्यमंत्री पाहिलाय का? वारकरी गेले भारावून ; पहा या फोटोत ; पंढरपूर

Next Post

शरीर सोलापुरात मात्र जीव अडकला पंढरपुरात ; या वरिष्ठ अधिकाऱ्याची अशी ही घालमेल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शरीर सोलापुरात मात्र जीव अडकला पंढरपुरात ; या वरिष्ठ अधिकाऱ्याची अशी ही घालमेल

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985931
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group