सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या समर्थक माजी नगरसेवकांसह भेट घेतली. या भेटीनंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महेश कोठे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला म्हणून बातम्या आल्या.
मात्र माजी विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे व माजी नगरसेवक मनोज शेजवाळ या दोन्ही नेत्यांनी आपण शिंदे गटाचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाले. या राजकीय घडामोडीनंतर महेश कोठे यांनी पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली.
या भेटीवर स्पष्टीकरण देताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीवेळी त्या वेळचे नगरविकास मंत्री व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सहकार्य केले होते, निवडीला स्टे दिला होता.
तेच आज मुख्यमंत्री झाले म्हणून राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपण त्यांची भेट घेतली असे स्पष्टीकरण देत कोठे यांनी स्वतःची सावरासावर केल्याचं दिसून येते.


















