सोलापूर : प्रेरणा बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्यावतीने आषाढी एकादशी दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या दिंडीत केगाव व बाळे येथील तब्बल 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बालगोपाळांच्या हरिनामाच्या गजराने वातावरण भक्तीमय झाले होते.
यावेळी फराळ म्हणून बालकांना केळी, बटाटा चिप्स, राजगिरा लाडू व सुंगधी दूध वाटप करण्यात आले. दिंडीसाठी माधुरी गोयदानी, जय गोयदानी, गोपीनाथ काका व परिवार यांचे सहकार्य लाभले.
दिंडीत संस्था अध्यक्ष प्रमिला उबाळे, प्रज्ञा ननवरे, पियुष ननवरे,अश्विनी इगवे, कल्पना बारडोळे, नीता भोसले, मेघा भोसले, काजल भोसले यांच्यासह सर्व पालक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















