सोलापूर : पती पत्नी दोघेही मुख्याध्यापक, गलेलठ्ठ पगार. सर्व काही ठिकठाक असताना पती मुख्याध्यापकने आत्महत्येचा मार्ग निवडला. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. या घटनेने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात शहरात घडली. ही वार्ता कळताच एकच खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापक किशोर अनंत भागवत असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. भागवत यांना पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
करमाळा शहरातील नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक किशोर अनंत भागवत ( वय – ४८) यांनी पोफळज (ता. करमाळा) येथील रेल्वे रूळावर आत्महत्या केली आहे. भागवत यांनी आत्महत्या केल्याने करमाळा शहरातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
हा प्रकार सोमवारी (ता. ११) पहाटे अडीचच्या सुमारास घडला आहे. भागवत यांच्या खिशातील एटीएम कार्ड व मोबाईलवरून त्यांची ओळख पटली आहे.किशोर भागवत करमाळा नगरपरिषदे मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पत्नी माया भागवत या सिताबाई परदेशी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत.भागवत यांनी मोटारसायकल बाजूला लावून रेल्वेरूळावर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यात जोराच्या धडकेत त्यांचा चेहरा उद्ध्वस्त झाला असून पाय तुटलेला आहे. त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण झाले. मात्र जवळील वस्तूवरून त्यांची ओळख पटण्यास मदत झाली. भागवत यांच्या मृत्यूमुळे नगरपालिकेतील शाळांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती आहे.

















