सोलापूर : सोलापूर भारतीय जनता पार्टीसाठी मोठी अडचण आणणारी घटना समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एका महिलेविरोधात मुंबईमध्ये हनीट्रॅपची केस दाखल केली होती.
त्यानंतर मंगळवारी त्याच महिलेने आपला बेडरूम मधील व्हिडिओ स्वतःहून व्हायरल केला आहे. त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे दिसतात आणि दोघांचे भांडण होते या व्हिडिओमुळे श्रीकांत देशमुख यांची अडचण वाढणार असून आता भारतीय जनता पार्टी याबाबत काय निर्णय घेणार या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


















